Showing posts with label शिवविचार. Show all posts
Showing posts with label शिवविचार. Show all posts

Saturday, 27 May 2017

शिवविचार 12

दिनांक:- 27/05/2017

वार :- शनीवार


*शिवविचार*


एकदा एका तळ्यातला बेडकांना वाटले, की आपल्याला एक राजा हवा. म्हणून त्यांनी देवाकडे तशी मागणी केली. तेव्हा देवाला हसूच आले व त्याने 'हा घ्या राजा !' म्हणून एक लाकडी ओंडका तळ्यात टाकला. तो पाण्यावर पडताच पाणी उसळले. ते पाहून सगळे बेडूक घाबरले आणि बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने पाणी शांत झाल्यावर तो ओंडका काही हालचाल करीत नाही असे पाहून त्याच्यावर चढले व उड्या मारू लागले. मग त्यांना वाटले की या राजापेक्षा दुसरा चांगला राजा हवा. तेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना करून दुसरा चांगला राजा पाठवण्याची विनंती केली. देवाने एक बगळा पाठविला. त्याने बेडकांना मारून खायला सुरुवात केली. म्हणून बेडकांनी देवाकडे अजून चांगल्या राजाची मागणी केली. ते ऐकून देव म्हणाला, 'मी तुम्हांला पहिला राजा पाठवला होता तो तुम्हांला आवडला नाही. आता तुमचं कर्म तुम्हीच भोगा.'

*शिवविचार*
- देवाने ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधानी असावे.

कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

शिवविचार 11

दिनांक:- 26/05/2017
वार :- शुक्रवार


*शिवविचार*

एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.

*शिवविचार*
- आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.

कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

शिवविचार 10

दिनांक:- 25/05/2017
वार :- गुरूवार


*शिवविचार*

एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्याभोवती फार दिवस घिरट्या घालून कंटाळली, पण एकही कबुतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने एक युक्ती केली. ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली, 'अहो, माझ्यासारख्या बळकट व शूर पक्ष्याला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे नि तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन.' ससाण्याकडून होणार्या त्रासाला कबुतरे इतकी कंटाळली होती की त्यांनी घारीचे म्हणणे लगेच मान्य केले व तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली. पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते, असे त्यांच्या लवकरच लक्षात आले व विचार न करता ह्या दुष्ट पक्ष्याला घरात जागा दिल्याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.

*शिवविचार*

- एका शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून दुसर्या शत्रूचे साहाय्य घेणे मूर्खपणाचे होय

कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

शिवविचार 09

दिनांक:- 24/05/2017

वार :- बुधवार




*शिवविचार*


एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, 'अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.' यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, 'अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.' इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.

*शिवविचार*
- संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.

कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

Friday, 19 May 2017

शिवविचार 5

दिनांक:- 20/05/2017
वार :- शनिवार
*शिवविचार*आणि एक शिवकथा

प्रेमाची लढाई हरला, "अस्तित्वा'ची जिंकला..!
#यशोगाथा
भरत तुकाराम पाटील-आरूळकर-पीएसआय
आरूळ (ता. शाहूवाडी).

एका मुलीवर माझं जीवापाड प्रेम. ती म्हणजे माझं सर्वस्व; मात्र माझ्या कुटुंबीयांना माझं प्रेमप्रकरण कळलं व त्यांचा लग्नाला विरोध झाला. तिच्या लग्नानंतर स्वत:चं अस्तित्व गमावल्यासारखं वाटू लागलं. मी अबोल झालो आणि मनात आत्महत्येचा विचार येऊ आला. काही जण भरत "बाद‘ झाला असे म्हणू लागले; पण एके दिवशी ही निराशा झटकून जागा झालो. जे झालं ते झालं असा विचार करून गेलेलं. "अस्तित्व‘ पुन्हा मिळवायचं, असं ठरवून टाकलं. मग थेट कोल्हापूर गाठलं व स्पर्धा परीक्षेचा मोठ्या जिद्दीने अभ्यास करू लागलो.‘‘

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या (पीएसआय) परीक्षेत राज्यात चौथा आलेला भरत तुकाराम पाटील-आरूळकर सांगत होता. प्रेमाच्या लढाईत हरलो तरी चालेल; पण स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याच्या लढाईत जिंकलो, असाच संदेश तो देत होता. प्रेमवीरांनो, एक मुलगी म्हणजे आयुष्य नव्हे, आयुष्यात खूप काही करण्यासारखं असतं. त्यामुळे खचू नका. जिद्द ठेवा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे तो सांगत होता.

आरूळ (ता. शाहूवाडी) हे भरतचे गाव. त्याचे वडील माजी सैनिक. त्यांचा 1965 व 71च्या युद्धात सहभाग होता. काका ज्ञानदेव बाळा पाटील हे सेकंड मराठा लाइट इन्फंट्रीत होते. भरत सैनिकी घराण्याचा वारसदार. त्याचे शालेय शिक्षण विद्यामंदिर आरूळ, श्री शाहू हायस्कूल (शाहूवाडी), पन्हाळा विद्यामंदिरमधून झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना तो एका मुलीच्या प्रेमात गुंतला आणि दोघांनी लग्न करायचे निश्चित केले. चांगल्या नोकरीसाठी भरतने एमबीएच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात त्याच्या कुटुंबीयांना त्याचे प्रेमप्रकरण कळाले आणि त्यांनी लग्नाला नकारघंटा वाजवली. एमबीएची शेवटची सेमिस्टर सुरू असताना तिचं लग्न झालं आणि तो सैरभैर झाला. सहा महिने तो ताणतणावात राहिला आणि त्यानंतर त्याचा जिद्दीचा प्रवास सुरू झाला.

या आठवणी जाग्या करत भरत म्हणाला, ""प्रेमातील अपयशातून एके दिवशी जागा झालो आणि दुखावलेल्या मनात एक ठिणगी पेटली. एमपीएससीतून अधिकारी होऊन, गेलेली इज्जत परत मिळवायची, असाच मी निर्धार केला. या परीक्षेतून यश सहज मिळत नसल्याने, अनेकांचा राग ओढवून घेतला. अभ्यास सुरू केल्यानंतर पुन्हा सर्वांनी हा कामातून गेला, अशीच ओरड सुरू झाली; पण माझ्यामागे पुन्हा आई-वडील, बहीण शोभा, स्वाती, भावजी अशोक पाटील, सुरेश पाटील व सरदार शिंदे खंबीरपणे पाठीशी राहिले. सुरवातीला एमपीएससीचा अभ्यासक्रम कोणता, हेच माहीत नव्हते.

जॉर्ज क्रूझ, राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनातून अभ्यास कसा करावा हे कळत गेले. मला 2011 ला पीएसआयच्या अंतिम यादीत सोळा, तर 2012 ला एसटीआयच्या अंतिम परीक्षेत दोन गुण कमी पडले. राज्यसेवा पूर्व परीक्षेत एक गुण कमी पडला. गेल्यावर्षी पीएसआयच्या पूर्व व अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर फिजिकलची जोरदार तयार केली. राजू कावळे, पीएसआय विजय नाईक, अभिजित पारखे, विक्रम तासगावकर, एक्साईज इन्स्पेक्टर विशाल आळतेकर, सतीश भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. अभिजित जाधव व जमीर मुल्ला यांनी अभ्यासाकरिता सहकार्य केले. त्यामुळेच आज पीएसआय होऊ शकलो.‘‘

भरत तुकाराम पाटील (रा. आरूळ, ता. शाहूवाडी)
शिक्षण - बी.एस्सी. केमिस्ट्री (गोखले महाविद्यालय)
एम.बी.ए. मार्केटिंग फायनान्स (सायबर)
एम.फिल. (शिवाजी विद्यापीठ)

अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचत गेलो आणि त्यांनी कोणत्या अडचणींतून इतिहास घडवला, हे कळत गेले. आज प्रेमातील अपयशातून आत्महत्येकडे वळणारे अनेक तरुण आहेत. त्यांनी या थोर महापुरुषांची चरित्रे जरूर वाचावीत आणि आयुष्यात चांगल करण्यासाठी प्रयत्न करावा.‘‘
- भरत पाटील
*शिवविचार* *:-*
*जेव्हा तुमच्या मनात प्रयत्न सोडून देण्याचा विचार येईल तेव्हा त्या माणसांचा विचार करा ज्यांना तुमचा पराभव पाहून आनंद होईल.*


कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह
शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*



क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

http://app.appsgeyser.com/4888125/shambhuraje%20school


  ह्यावर क्लिक करा व app dpwnload  करा व सर्व माहिती एका क्लिक वर मिळवा 

एकच मिशन सर्वाना शिक्षण मिळवण्यास मदत करणे ..

तरी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी यांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी  app download करून 

योग्य ती माहिती जाणून काम करावे ....... 

Thursday, 18 May 2017

शिवविचार 4

शिवविचार 4

दिनांक:- 19/05/2017
वार :- शुक्रवार

*शिवसंदेश*

PSI मुख्य परीक्षेला पात्र न झालेल्या विद्यार्थ्यांना खास संदेश..

निराश होऊ नका. हरणे म्हणजे एक नवीन सुरुवात आहे जिंकण्याची."
‘मी हरलो. त्यासाठी नक्कीच दु:ख वाटत आहे. मात्र हा खेळ आहे. चांगले वाईट क्षण येतच असतात. आजचा क्षण माझ्यासाठी दु:खाचा आहे. खेळात हे सर्व काही घडू शकते हे मला स्वीकारण्याची गरज आहे. या पराभवातून शिकून मी पुढे जात राहणार. जीवन सुरुच राहते आणि माझी कारकिर्दही.’
-- राफेल नदाल

विद्यार्थी मित्रहो,
१०० पैकी ४०% मार्क्सही आपल्याला पडत नसेल तर आपले कुठेतरी चुकत आहे हे नक्की. त्यामुळे निराश होऊ नका. अजून जोमाने व वेग-वेगळ्या नव्या जून्या पध्दतीचा अवलंब करुन अभ्यासाला लागा. आताच थोड्या वेळा पूर्वी राफेल नदाल काय म्हणाला हे सांगितले आहे.

जिंकण्याला एक निश्चित अशी मर्यादा असते. एक विनिंग लाईन पार करुन आपल्याला थांबावेच लागते. पण पराजयाला कोणतीही मर्यादा नाही. हरलो तरीही आपल्याला विनिंग लाईन पार कराविच लागते. व सुरु होतो पुन्हा एक नवीन प्रवास, एक नवी स्पर्धा, एक नवीन विनिंग लाईन.........

*शिवविचार:-* आता तुम्हांला मागेच थांबायचे की पुढे पळायचे तुम्हीच ठरवा.आणि लागा कामाला आपला प्रत्येक सेकंद आपण कसा वापरतोय याचा विचार करा आणि हे खरं आहे की नाही नक्की मला सांगा माझ्या ब्लॉग वर

कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

Wednesday, 17 May 2017

शिवविचार ३

दिनांक:- 18/05/2017
वार :- गुरुवार
*शिवविचार*
आजचा शिवविचार आणि एक गोष्ट

:tea:Tea Time Special
*आयुष्य म्हणजे कॉफी*

एकदा आपापल्या क्षेत्रात नावाजलेले चार पाच प्रतिथयश लोक आपल्या एक जुन्या गुरुजीना भेटायला गेले. निमित्त तसे बघायला गेलं तर नेहमीचेच होते, म्हणजे आज काल गुरुजींची तब्येत बरी नसायची.

गुरुजी म्हणजे तसे साधेच. कधी पैशाचा लोभ नाही कि कधी वरच्या पदांसाठी कोणापाशी वशिलेबाजी नाहि. फक्त ज्ञानदान आणि माणसे जोडणे हेच छंद त्यांनी आयुष्याभर जोपासले.

गुरुजींना भेटल्यावर जरा नेहमीची विचारपुस झाल्यावर गाडी नेहमीच्या संभाषनांकडे वळाली. हा कुठे असतो? तो कुठे असतो? हि भेटली होती? तिचा मुलगा ईकडे असतो वगैरे वगैरे. आज काल वेळच मिळत नाही, खुप व्यस्त असतो, घरी पण जास्त वेळ देत येत नाही, कामाच्या व्यापातुन तब्येतीकडे सुद्धा लक्ष देता येत नाही, ईथे येण्यासाठी पण कसा बसा वेळ मिळाला, जवळ जवळ प्रत्येकाचा हाच सुर होत.

गुरुजींनी रंगलेल्या गप्पांकडे बघत मस्तपैकी कॉफी बनवायला टाकली.घरात असलेले जे काही चार दोन मोडके तोडके कप होते त्यातुन ती कॉफी मुलांसमोर आणली.

कॉफी पिता पिता गुरुजींनी “विचारले कशी झाली आहे कॉफी?”

सगळ्यांच्या कडुन एकजात उत्तर “छानच झाली आहे”

तितक्यात गुरुजींचा पुढचा प्रश्न आलाच,” तुम्हाला काहीना सुंदर नविन कप मिळाले तर काहीना जुने तुटके, कान तुटलेले कप मिळाले. काय करणार माझ्याकडे फक्त हेच कप आहेत.” सगळ्यांना गुरुजींच्या या वाक्यावर अवघडल्या सारखेच झाले.

एक जण कसातरी धीर करुन म्हणाला, “अहो गुरुजी कपांचं काय ते घेउन बसलात, तुम्ही आमच्या साठी इतकी सुंदर कॉफी बनवलीत यातच खुप काही आले.”

गुरुजी उत्तरले,
“मित्रांनो, हे आयुष्य म्हणजे या कॉफीसारखे आहे. आणि तुमचं हे करियरचे चढते आलेख, हे ऐश्वर्य, हि मोठ मोठी घरे, या गाड्या, म्हणजे हा कप आहे. जो फक्त आयुष्याला चांगले कोंदन देण्याचा प्रयत्न करतो. पण आपण सगळे हा कप सुंदर करायच्या नादात कॉफीची मजा घ्यायला विसरतो आहोत. कॉफीची चव ही कपावर अवलंबुन नसते.”

“हे यशस्वी करियर, हे ऐश्वर्य म्हणजे आयुष्य नव्हे, या गोष्टी जरुर मिळवा, यशस्वी होण्याची महत्वाकांक्षा जरुर ठेवा. पण त्याच बरोबर, फक्त याच सर्व गोष्टी म्हणजे आयुष्य असा गैरसमज करुन घेउ नका.

*शिवविचार*:- हातातला कप जास्तीत जास्त सुंदर करायच्या प्रयत्नात खर्या आयुष्याची चव आणि गोडी चाखायला तर आपण विसरत नाही ना याकडे पण लक्ष द्या.आयुष्यात प्रत्येकाला चांगलेच भेटेल असे नसते जितके खडतर तितके चांगले लक्षात ठेवा आणि विचार करून पाहा

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8



https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

    शिवविचार २

    दिनांक:- 17/05/2017
    वार :- बुधवार
    *शिवविचार*
    आजचा शिवविचार आणि एक गोष्ट

    :boom:यशोगाथा- लखन धुमाळ:boom:
    कौटुंबिक माहिती:-
    - वडील १०वीत असतांना वारले
    - आई व लहान भावासोबत पारंपारिक शेती व्यवसाय
    शैक्षणिक माहिती:-
    - १० वी ७१.८४%
    - १२ वी ८४.३३%
    - घरची परिस्थिती नसल्यामुळे पुढे डी एड केलं
    संघर्षगाथा:-
    - पैसा नसल्याने घरीच अभ्यासाला सुरुवात केली
    - एकूण २४ परीक्षा दिल्या
    - २०१३ ची PSI एक मार्काने गेली
    - PWD औरंगाबाद २ मार्काने
    - तर बीड तलाठी ३ मार्काने
    - पण जिद्द सोडली नाही.पुन्हा जोमाने अभ्यासाला लागलो.
    यशाची चव चाखली:-
    - DMER क्लर्क
    - त्याच्या दुसर्याच दिवशी कर सहायक(सेल्स टॅक्स)
    - व १५ दिवसानंतर मंत्रालय क्लर्क
    - ४ वर्षे अपयश व बेकारी झेलली पण फक्त २० दिवसात ३ सरकारी नोकर्या मिळाल्या.
    - आयुष्य क्षणात बदलले.
    माझ्या आजवरच्या लढाईत माझ्या आईचा मला असलेला पाठिंबा व तिने माझ्यासाठी दैनंदिन रोजगारी करत मला दिलेले शिक्षण हेच माझ्या यशाचे सर्वात मोठे कारण आहे.आज ती नसती तर हे शक्य नसते.
    आता पुढे अजून अभ्यास करत आहे.आईच्या चेहर्यावर मुलगा मोठा अधिकारी झाला याचे समाधान पहायचे आहे.
    जेव्हा मी परीक्षार्थी होतो तेव्हा लोक फुकटचे सल्ले देत असत आता हेच लोक माझे गावात पोस्टर लावतात व आमच्या गावाचा मुलगा आहे हे अभिमानाने सांगतात.
    आई म्हणते सून कधी आणणार? नोकरी पाहून मोठ्या घरची मागणे येत आहेत आता.
    मित्रांनो,
    माझे यश पाहून प्रत्येक गरीब कुटुंबाने हे लक्षात घ्यायला हवे की,यश मेह्नतीनेच मिळते पैशाने नाही.तुम्हां सर्वाना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.खूपखूप मेहनतघ्या वआपल्या आई वडिलांची सेवा करत यादेशाला घडवा.
    आपल्यातीलच एक,
    - लखन धुमाळ

    *शिवविचार*:- माणूस हरत नसतो हरत असतो विश्वास , जिद्द पण जर आपण त्यालाच जिकून ठेवले एक ना एक दिवस आपण यशस्वी होणार हे सत्य आहे विचार करून पहा.

    *Never bother about failure*.
    कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

    शिव हस्ते
    श्रीकांत मुळीक
    शाहू महाराज वसतिगृह

    शंभुराजे माध्यमिक विद्यालय
    देवलाई चौक छत्रपतिनगर
    सातारा परिसर
    औरंगाबाद
    शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
    संपर्क 9405423134/7/8