Wednesday, 17 May 2017

शिवविचार २

दिनांक:- 17/05/2017
वार :- बुधवार
*शिवविचार*
आजचा शिवविचार आणि एक गोष्ट

:boom:यशोगाथा- लखन धुमाळ:boom:
कौटुंबिक माहिती:-
- वडील १०वीत असतांना वारले
- आई व लहान भावासोबत पारंपारिक शेती व्यवसाय
शैक्षणिक माहिती:-
- १० वी ७१.८४%
- १२ वी ८४.३३%
- घरची परिस्थिती नसल्यामुळे पुढे डी एड केलं
संघर्षगाथा:-
- पैसा नसल्याने घरीच अभ्यासाला सुरुवात केली
- एकूण २४ परीक्षा दिल्या
- २०१३ ची PSI एक मार्काने गेली
- PWD औरंगाबाद २ मार्काने
- तर बीड तलाठी ३ मार्काने
- पण जिद्द सोडली नाही.पुन्हा जोमाने अभ्यासाला लागलो.
यशाची चव चाखली:-
- DMER क्लर्क
- त्याच्या दुसर्याच दिवशी कर सहायक(सेल्स टॅक्स)
- व १५ दिवसानंतर मंत्रालय क्लर्क
- ४ वर्षे अपयश व बेकारी झेलली पण फक्त २० दिवसात ३ सरकारी नोकर्या मिळाल्या.
- आयुष्य क्षणात बदलले.
माझ्या आजवरच्या लढाईत माझ्या आईचा मला असलेला पाठिंबा व तिने माझ्यासाठी दैनंदिन रोजगारी करत मला दिलेले शिक्षण हेच माझ्या यशाचे सर्वात मोठे कारण आहे.आज ती नसती तर हे शक्य नसते.
आता पुढे अजून अभ्यास करत आहे.आईच्या चेहर्यावर मुलगा मोठा अधिकारी झाला याचे समाधान पहायचे आहे.
जेव्हा मी परीक्षार्थी होतो तेव्हा लोक फुकटचे सल्ले देत असत आता हेच लोक माझे गावात पोस्टर लावतात व आमच्या गावाचा मुलगा आहे हे अभिमानाने सांगतात.
आई म्हणते सून कधी आणणार? नोकरी पाहून मोठ्या घरची मागणे येत आहेत आता.
मित्रांनो,
माझे यश पाहून प्रत्येक गरीब कुटुंबाने हे लक्षात घ्यायला हवे की,यश मेह्नतीनेच मिळते पैशाने नाही.तुम्हां सर्वाना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.खूपखूप मेहनतघ्या वआपल्या आई वडिलांची सेवा करत यादेशाला घडवा.
आपल्यातीलच एक,
- लखन धुमाळ

*शिवविचार*:- माणूस हरत नसतो हरत असतो विश्वास , जिद्द पण जर आपण त्यालाच जिकून ठेवले एक ना एक दिवस आपण यशस्वी होणार हे सत्य आहे विचार करून पहा.

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

No comments:

Post a Comment