Saturday, 27 May 2017

शिवविचार 12

दिनांक:- 27/05/2017

वार :- शनीवार


*शिवविचार*


एकदा एका तळ्यातला बेडकांना वाटले, की आपल्याला एक राजा हवा. म्हणून त्यांनी देवाकडे तशी मागणी केली. तेव्हा देवाला हसूच आले व त्याने 'हा घ्या राजा !' म्हणून एक लाकडी ओंडका तळ्यात टाकला. तो पाण्यावर पडताच पाणी उसळले. ते पाहून सगळे बेडूक घाबरले आणि बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने पाणी शांत झाल्यावर तो ओंडका काही हालचाल करीत नाही असे पाहून त्याच्यावर चढले व उड्या मारू लागले. मग त्यांना वाटले की या राजापेक्षा दुसरा चांगला राजा हवा. तेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना करून दुसरा चांगला राजा पाठवण्याची विनंती केली. देवाने एक बगळा पाठविला. त्याने बेडकांना मारून खायला सुरुवात केली. म्हणून बेडकांनी देवाकडे अजून चांगल्या राजाची मागणी केली. ते ऐकून देव म्हणाला, 'मी तुम्हांला पहिला राजा पाठवला होता तो तुम्हांला आवडला नाही. आता तुमचं कर्म तुम्हीच भोगा.'

*शिवविचार*
- देवाने ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधानी असावे.

कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

शिवविचार 11

दिनांक:- 26/05/2017
वार :- शुक्रवार


*शिवविचार*

एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.

*शिवविचार*
- आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.

कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

शिवविचार 10

दिनांक:- 25/05/2017
वार :- गुरूवार


*शिवविचार*

एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्याभोवती फार दिवस घिरट्या घालून कंटाळली, पण एकही कबुतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने एक युक्ती केली. ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली, 'अहो, माझ्यासारख्या बळकट व शूर पक्ष्याला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे नि तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन.' ससाण्याकडून होणार्या त्रासाला कबुतरे इतकी कंटाळली होती की त्यांनी घारीचे म्हणणे लगेच मान्य केले व तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली. पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते, असे त्यांच्या लवकरच लक्षात आले व विचार न करता ह्या दुष्ट पक्ष्याला घरात जागा दिल्याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.

*शिवविचार*

- एका शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून दुसर्या शत्रूचे साहाय्य घेणे मूर्खपणाचे होय

कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

शिवविचार 09

दिनांक:- 24/05/2017

वार :- बुधवार




*शिवविचार*


एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, 'अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.' यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, 'अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.' इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.

*शिवविचार*
- संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.

कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

Tuesday, 23 May 2017

शिवविचार ०८

शिवविचार ०८
दिनांक:- 23/05/2017
वार :- मंगळवार







*शिवविचार*

गेल्या काही वर्षापासून मी तुम्हांला अभ्यासत आहे, यात एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तुम्ही सर्व नक्कीच हुशार आहे किंवा हुशार म्हणण्यापेक्षा पास होऊ शकेल असे प्रत्येक विषयाचे जेमतेम ज्ञान बऱ्यापैकी कमाविले आहे. (माझ्यापेक्षा तरी १००% जास्त)
पण अडत कुठे आहे तर नियोजन,वक्तशीरपणा व शिस्त या गोष्टीत.बहुतेक सर्व विद्यार्थ्यांकडे अभ्यासाचे वेळापत्रक (टाईमटेबल) आहे.ते पाळत ६/७ तास तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यासही करत आहात.पण ते पुरेसे नाही.

मित्रहो,खरे तर तुम्ही करत असलेले प्रयत्न प्रामाणिक असले तरी तुम्ही या गोष्टीसाठी खरोखरच मानसिकदृष्ट्या तयार आहात का? हा खरा प्रश्न आहे.
दिवसभराचे बिझी शेड्यूल्ड पाळत अभ्यासाला जो वेळ मिळतो तो अगदी तुटपुंजा असतो अशी आपली तक्रार असते.पण मित्रहो, अभ्यासाला वेळ किती आहे? यापेक्षा आपण अभ्यास कसा करतो याला महत्त्व आहे.अन हे तुम्हांला माहित नाही असे होणे शक्य नाही.
तर मुख्य मुद्दा आहे आपण अभ्यासाला मानसिकदृष्ट्या तयार असणे अत्यावश्यक आहे.

मग यासाठी काय केले पाहिजे?

१) सकाळी म्हणजे कमीत कमी ५ व जास्तीत जास्त ६ वाजेपर्यंत थोडेसा व्यायाम, प्राणायाम,शक्य असल्यास शरीर ताणले जाईल(स्ट्रेच्ड) असा व्यायाम असावा.अगदी ६ पॅक्स ८ पॅक्स ची गरज नाही.

२) स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता बहुतेक जन नास्तिकतेकडे वळतात.पण संशोधनाअंती सिध्द झाले आहे की, अभ्यासाअगोदर जर आपण आपले मन प्रार्थनेत गुंतवले तर मन स्थिरावते.आता यासाठी अगदीच प्रार्थना- आरत्या पाठ करण्याची आवश्यकता नाही.आपल्या संत ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी *पसायदान* मागितले आहे.त्यातील दोन ओळी जरी म्हटल्या तरी पुरेसे. ते नास्तिकही म्हणू शकतात. अथवा साने गुरुजींची प्रार्थना *खरा तो एकचि धर्म.* जर हेही आवडत नसेल तर *भारत माझा देश आहे* हेही ठिक आहे.
(लक्षात घ्या हे मार्ग व्यक्तीने आपल्या बुध्द्दीला आवडले तरच ठिक नाहीतर *दुनियादारी* करु नका)

३) विशेषता: घरची कामे करा. शक्य असल्यास शिकून घ्या. आपल्या आवडीच्या डिशेस कशा बनतात हे शिका. आपल्या आई वडिलांना वेळ द्या.

४) मित्रांना वेळ द्या.अगदी आपल्या प्रेमालाही.कारण पुढे आपल्याला ज्या समाजासाठी काम करायचे आहे त्याचा अभ्यास येथूनच होणार आहे. मॉक टेस्ट कशी देतो तसेच आहे हे थोडे.सिस्टीममध्ये राहून सर्वांची मर्जी संभाळत कायदा व सुव्यवस्था राखत काम कसे करायचे हे इथे शिकायला मिळते.

५) आपल्या आवडी निवडी व छंदाला जोपासा. यातून तुम्हांला रिफ्रेश वाटेल. अन मुख्य म्हणजे मुलाखतीत यावर भरपूर प्रश्न असतात.

६) एक दिवस प्लॅन करत पूर्ण दिवस अभ्यास टाळा व आपल्या आवडीच्या गोष्टी करा.

७) पर्यटनस्थळी फिरायला जा. लांब लांब जायची गरज नाही आपल्या गावातील जवळच्या ठिकाणी गेले तरी काम होते. यातून तुमचा पर्यावरणाचा अभ्यास होतो.ग्लोबल वार्मिंग काय आहे हे डोक्यात घुसेल.

७) Youtube वर अनेक चांगले व्हिडिओ असतात ते पहा. आंबटशौकीन काहीही पाहू शकतात पण एका मर्यादित वेळेपुरते. आपले पाहणे आपली विकृती बनू नये अशा पध्दतीने. हे सांगण्याचा हेतू फक्त *आनंदी राहणे* हा आहे. पण आपला आनंद फक्त आपल्यापुरता असावा. कोणालाही त्याचा त्रास होता कामा नये. समाधानी असणे हे इथे महत्वाचे आहे.

८) सोशल मिडियावरील फॉरवर्ड मेसेज, व्हिडिओ यापासून शक्यतो दूर रहा. त्यापेक्षा Twitter वरील ट्रेंड पहा. अनेक चांगल्या Twitter चॅनेलचे मायक्रो अपडेट वाचा. *चालू घडामोडीसाठी* याचा नक्की फायदा होतो.

९) इंग्रजीचा झेपेल एवढा नक्की अभ्यास करा. पुस्तके वाचा.इंग्रजी संपादकीय शिवाय सध्या तरी पर्याय नाही.

*शिवविचार* :- लास्ट & बेस्ट. शक्यतो आपल्या भावना व्यक्त करण्यास शिका.
बोलके व्हा.
लिहते व्हा..
कर्ते व्हा...
कमावते व्हा....

कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

शिवविचार ०७

शिवविचार ०७
दिनांक:- 22/05/2017
वार :- सोमवार




*शिवविचार*


२०१७ या वर्षात एकापाठोपाठ एक आयोगाच्या परीक्षा येत आहे.असे काही पहिल्यांदाच घडत आहे असे काही नाही.दरवर्षी आयोगाचा हा नियोजित कार्यक्रम ठरलेला असतो.गोंधळ उडतो तो आपलाच.

सध्या एक प्रश्न व्हायरल होत आहे की राज्यसेवेचा अभ्यास करु की PSI/STI/ASO पूर्व परीक्षेचा.त्यात विविध मान्यवर व या क्षेत्रातील तज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना या गोंधळातून बाहेर काढण्यासाठी विविध चांगले उपाय सूचवित आहे.ही गोष्ट चांगली.

मित्रहो,बऱ्याचदा आपले काय होते, मला एक अमूक पोस्ट हवी असते व ती मी मिळविणाराच असा आपला टिळकहक्क असतो.यात वागवे असे काहीच नाही.परंतु कोणत्याही कारणाने यात अपयश आले तर आपले वर्ष वाया जाते.असे होता कामा नये.यावर उपाय काय असू शकतात ते पाहूया.

१) सर्वप्रथम तर आपले बेसिक ज्ञान सर्वसाधारण असायला हवे.
२) गणित, बुद्दीमत्ता व व्याकरण या विषयाचा सराव अधून मधून असायला हवाच. तसेच CSAT बद्दलही नियोजन करत अभ्यास करायला हवा.
३) चालू घडामोडी म्हणजे हमखास पास हा प्रकार आहे. त्यामुळे हा विषय रोजच्या नाष्टात हवाच.
४) सध्या तरी पूर्वपरीक्षाच टारगेट करत या परीक्षांना असलेल्या विषयांचे अध्ययन करायला हवे.
५) पूर्वपरीक्षेच्या अभ्यासात चालू घडामोडी या विषयावर लक्ष दिले तर नंतर होणाऱ्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्व व मुख्य परीक्षा दरम्यान असलेल्या गॅपमध्ये सहज पूर्ण होतो.
६) हे सर्व करत असतांना सरकारी वेबसाईट व बातम्या तसेच डिबेट्स अवश्य पहा.
७) इंग्रजी आपली मावशीच आहे त्यामुळे कळो अथवा न कळो इंग्रजी संपादकीय व अपडेट्स अवश्य वाचा.
८) जास्त पुस्तकांच्या प्रेमात पडू नका.एकनिष्ठ रहा.
९) सराव प्रश्न व आयोगाचे प्रश्न यावर प्रॅक्टिस करा.
१०) मुख्य म्हणजे आनंदी व फिट रहा.व्यसनांवर नियंत्रण आणा, टाळता येत असेल तर उत्तमच.अभ्यासाबरोबर थोडेफार काम करा व मनोरंजनाचा तसेच मेडिटेशनचा लाभ घ्या.

*शिवविचार* :- यश आपलेच असते ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

शिवविचार 06







शिवविचार 6
दिनांक:- 21/05/2017
वार :- रविवार
*शिवविचार*


विद्यार्थी मित्रहो आणि मैत्रिणींनो,
सर्वप्रथम तर STI परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छ्या...

आता आपण विनिंग लाईनच्या अगदी समीप येवून पोहचलो आहोत. बस दोन पावले धावले की शर्यत जिंकली. पण लक्षात घ्या इथे नो बॉल टाकू नका म्हणजे झाले. असा फ्री हिट मिळेल की सरळ मैदानाबाहेर भिरकावून दिले जाईल.

वर्षभर केलेल्या अभ्यासाचे चीज होण्याचा सुवर्णक्षण अगदी जवळ येवून ठेपला आहे. तेव्हा आता थोडासा मन, तन, बुध्दी आणि डोळ्यांना विसावा द्या. आपण आतापर्यत जे वाचले आहे. ते बुध्दीला थोडा ताण देवून आठवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची लक्षात राहण्याची क्षमता वाढेल व हृदयावरील परीक्षेचा ताणही कमी होईल.

आज आपल्याला प्रेरणा देणार्या व्यक्तींना भेटा, त्यांच्याशी बोला. मग ते तुमचे पालक असतील, गुरु असतील, मित्र-मैत्रिणी किंवा कोणी इतर.

मला तर रोज रेल्वे स्टेशनची उदघोषक प्रेरणा देत असते. ब्रीज चढत असतांना ती आपल्या सुमधूर आवाजात माझे स्वागत करते. आपला प्रवास सुखाचा होवो. हम आपके सुखद,मंगल एवंम उस्ताहपूर्ण दिन की मनोकामनाए करते है.

कदाचित तुमची प्रेरणा वेगळी असेल आजचा दिवस तिला द्या थोडा.

थोडे डोळे मिटून आठवा की मी अमूक-तमूक टॉपिक्स वर जे वाचले आहे. ते मला आठवते का?
संशोधनाअंती सिध्द झाले आहे की, जर तुम्ही एखादी घटना डोळे मिटून आठवली की ती नक्की आठवते.
आता ही गोष्ट वेगळी आहे की तुम्हांला डोळे मिटल्यावर कोण दिसते, तो-ती दिसत असेल तर आजच्या दिवशी यश चोपडाच्या चित्रपटांपासून दूर रहा.

*शिवविचार* :- शेवटी एकच वर्षभर केलेल्या मेहनतीला फळ येवू द्या.
मोगरा फुलवा.
हारो तो हारो पर इज्जत मत उतारो.
जीते रहो, गाते रहो..



कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*

https://t.me/joinchat/AAAAAEQTcVlu9gnqY0wSRw


क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर







Friday, 19 May 2017

शिवविचार 5

दिनांक:- 20/05/2017
वार :- शनिवार
*शिवविचार*आणि एक शिवकथा

प्रेमाची लढाई हरला, "अस्तित्वा'ची जिंकला..!
#यशोगाथा
भरत तुकाराम पाटील-आरूळकर-पीएसआय
आरूळ (ता. शाहूवाडी).

एका मुलीवर माझं जीवापाड प्रेम. ती म्हणजे माझं सर्वस्व; मात्र माझ्या कुटुंबीयांना माझं प्रेमप्रकरण कळलं व त्यांचा लग्नाला विरोध झाला. तिच्या लग्नानंतर स्वत:चं अस्तित्व गमावल्यासारखं वाटू लागलं. मी अबोल झालो आणि मनात आत्महत्येचा विचार येऊ आला. काही जण भरत "बाद‘ झाला असे म्हणू लागले; पण एके दिवशी ही निराशा झटकून जागा झालो. जे झालं ते झालं असा विचार करून गेलेलं. "अस्तित्व‘ पुन्हा मिळवायचं, असं ठरवून टाकलं. मग थेट कोल्हापूर गाठलं व स्पर्धा परीक्षेचा मोठ्या जिद्दीने अभ्यास करू लागलो.‘‘

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या (पीएसआय) परीक्षेत राज्यात चौथा आलेला भरत तुकाराम पाटील-आरूळकर सांगत होता. प्रेमाच्या लढाईत हरलो तरी चालेल; पण स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याच्या लढाईत जिंकलो, असाच संदेश तो देत होता. प्रेमवीरांनो, एक मुलगी म्हणजे आयुष्य नव्हे, आयुष्यात खूप काही करण्यासारखं असतं. त्यामुळे खचू नका. जिद्द ठेवा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे तो सांगत होता.

आरूळ (ता. शाहूवाडी) हे भरतचे गाव. त्याचे वडील माजी सैनिक. त्यांचा 1965 व 71च्या युद्धात सहभाग होता. काका ज्ञानदेव बाळा पाटील हे सेकंड मराठा लाइट इन्फंट्रीत होते. भरत सैनिकी घराण्याचा वारसदार. त्याचे शालेय शिक्षण विद्यामंदिर आरूळ, श्री शाहू हायस्कूल (शाहूवाडी), पन्हाळा विद्यामंदिरमधून झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना तो एका मुलीच्या प्रेमात गुंतला आणि दोघांनी लग्न करायचे निश्चित केले. चांगल्या नोकरीसाठी भरतने एमबीएच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात त्याच्या कुटुंबीयांना त्याचे प्रेमप्रकरण कळाले आणि त्यांनी लग्नाला नकारघंटा वाजवली. एमबीएची शेवटची सेमिस्टर सुरू असताना तिचं लग्न झालं आणि तो सैरभैर झाला. सहा महिने तो ताणतणावात राहिला आणि त्यानंतर त्याचा जिद्दीचा प्रवास सुरू झाला.

या आठवणी जाग्या करत भरत म्हणाला, ""प्रेमातील अपयशातून एके दिवशी जागा झालो आणि दुखावलेल्या मनात एक ठिणगी पेटली. एमपीएससीतून अधिकारी होऊन, गेलेली इज्जत परत मिळवायची, असाच मी निर्धार केला. या परीक्षेतून यश सहज मिळत नसल्याने, अनेकांचा राग ओढवून घेतला. अभ्यास सुरू केल्यानंतर पुन्हा सर्वांनी हा कामातून गेला, अशीच ओरड सुरू झाली; पण माझ्यामागे पुन्हा आई-वडील, बहीण शोभा, स्वाती, भावजी अशोक पाटील, सुरेश पाटील व सरदार शिंदे खंबीरपणे पाठीशी राहिले. सुरवातीला एमपीएससीचा अभ्यासक्रम कोणता, हेच माहीत नव्हते.

जॉर्ज क्रूझ, राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनातून अभ्यास कसा करावा हे कळत गेले. मला 2011 ला पीएसआयच्या अंतिम यादीत सोळा, तर 2012 ला एसटीआयच्या अंतिम परीक्षेत दोन गुण कमी पडले. राज्यसेवा पूर्व परीक्षेत एक गुण कमी पडला. गेल्यावर्षी पीएसआयच्या पूर्व व अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर फिजिकलची जोरदार तयार केली. राजू कावळे, पीएसआय विजय नाईक, अभिजित पारखे, विक्रम तासगावकर, एक्साईज इन्स्पेक्टर विशाल आळतेकर, सतीश भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. अभिजित जाधव व जमीर मुल्ला यांनी अभ्यासाकरिता सहकार्य केले. त्यामुळेच आज पीएसआय होऊ शकलो.‘‘

भरत तुकाराम पाटील (रा. आरूळ, ता. शाहूवाडी)
शिक्षण - बी.एस्सी. केमिस्ट्री (गोखले महाविद्यालय)
एम.बी.ए. मार्केटिंग फायनान्स (सायबर)
एम.फिल. (शिवाजी विद्यापीठ)

अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचत गेलो आणि त्यांनी कोणत्या अडचणींतून इतिहास घडवला, हे कळत गेले. आज प्रेमातील अपयशातून आत्महत्येकडे वळणारे अनेक तरुण आहेत. त्यांनी या थोर महापुरुषांची चरित्रे जरूर वाचावीत आणि आयुष्यात चांगल करण्यासाठी प्रयत्न करावा.‘‘
- भरत पाटील
*शिवविचार* *:-*
*जेव्हा तुमच्या मनात प्रयत्न सोडून देण्याचा विचार येईल तेव्हा त्या माणसांचा विचार करा ज्यांना तुमचा पराभव पाहून आनंद होईल.*


कृपया:- ही पोस्ट लवकर शेयर करावी ...

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह
शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

*कृपया पुढील https://shambhurajepattern.blogspot.in/2017/04/blog-post.html लिंक ला एकदा क्लिक करून ब्लॉग ला भेट देऊन आपला आशीर्वाद द्यावा*



क्लिक करा लिंकला आणि मी अनुभवातून जे शिकलो आणि दररोज नवीन कथा / गोष्टी वाचा माझ्या ह्या टेलिग्राम च्या शिवविचार चॅनेल वर

http://app.appsgeyser.com/4888125/shambhuraje%20school


  ह्यावर क्लिक करा व app dpwnload  करा व सर्व माहिती एका क्लिक वर मिळवा 

एकच मिशन सर्वाना शिक्षण मिळवण्यास मदत करणे ..

तरी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी यांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी  app download करून 

योग्य ती माहिती जाणून काम करावे .......