Wednesday, 17 May 2017

शिवविचार १

दिनांक:- 16/05/2017
वार :- मंगळवार
*शिवविचार*
आजचा शिवविचार आणि एक गोष्ट

एके ठिकाणी व्याख्यान चालू होते. नेहमीप्रमाणे कॉलजचे विद्यार्थी जमू लागले. त्यात काही विद्यार्थिनीपण होत्या. त्या मुलींचे पालक सोबत आले होते. त्यांनी बाहेर थांबणेच पसंत केले आता व्याख्यानाला सुरूवात होणार होती.
विषय होता, ‘आत्मविश्वास कसा वाढवावा?’
उपस्थिती जेमतेम.

ठिक वेळेवर व्याख्याते हजर झाले. त्यांनी सुचना केली, ‘पालकांनी पण सभागृहात बसावे.’ सर्व उपस्थितांना आजचा पेपर वाटण्यात आला. पेपर वाचण्यासाठी दहा मिनिटे होती.

पहिला प्रश्न आला, "मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांमध्ये आत्मविश्वास आहे का?" उत्तर आले, "जबरदस्त". पुढचा प्रश्न, "आणि लताताईंमध्ये?" उत्तर आले,"प्रश्नच नाही."

याचा अर्थ कोणामध्ये आत्मविश्वास आहे का नाही आणि असेल तर किती आहे, हे तुम्हाला ओळखता येते. बरोबर? आता मला फक्त एवढेच कळू दे की, ‘स्वतःमध्ये आत्मविश्वास कमी आहे’, याचा शोध तुम्हाला कधी लागला? किंवा तुम्ही कसे ठरविलात? आणि या प्रश्नाचे उत्तर पण तुम्हाला द्यावे लागेल, की जर ‘आत्मविश्वास वाढवायचा कसा हे सांगितलेत तरी आपल्यात आत्मविश्वास वाढविणे जरूरी आहे’ हा ठपका कायमच राहील. त्याचे काय?
म्हणजे, ‘तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा आहे.’

व्याख्यानानंतर घरी जाताना पण तुम्ही हेच घेऊन जाणार का? की, ‘आपल्याला आत्मविश्वास वाढवायचा आहे’.

*शिवविचार:- अर्थातच नेहमीप्रमाणे तुम्हीच ठरवा,तुम्हाला सगळ्यामध्ये आत्मविश्वास दिसतो मग स्वतः मध्ये कधी निर्माण करणार चला उठा आज स्वतः ला बदलून टाकू या*

*Never bother about failure*.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका :bouquet:

शिव हस्ते
श्रीकांत मुळीक
शाहू महाराज वसतिगृह

शंभुराजे माध्यमिक विद्यालय
देवलाई चौक छत्रपतिनगर
सातारा परिसर
औरंगाबाद
शिशुवर्ग ते 12 वि प्रवेश सुरू
संपर्क 9405423134/7/8

No comments:

Post a Comment